पुढील कार्यक्रम
Home / पुढील ट्रेक

पुढील ट्रेक

महत्वाची सूचना

देशात सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे श्री दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट संस्था आपले पुढील सर्व दुर्गभ्रमण आणि सामाजिक कार्यक्रम तूर्तास स्थगित करीत आहे. समाजाशी असलेली बांधिलकी आणि लोकांच्या उत्तम आरोग्यासाठी आपण हा निर्णय घेत आहोत. लोकांचे सरंक्षण आणि संगोपन अबाधित राहावे हाच आमचा शुद्ध हेतू आहे. भविष्यात होणाऱ्या सर्व दुर्गभ्रमण आणि सामाजिक कार्यक्रमांची माहिती आम्ही तुम्हाला कोरोना संकट दूर झाल्यावर देऊ.

आम्हाला माहीत आहे देशात टाळेबंदी सुरु आहे. ती उठवल्यावर आपण सर्व जण सह्याद्रीच्या भेटीला उत्सुक आहोत. कृपया करून टाळेबंदी उठल्यावर कोणीही सह्याद्रीत लगेच भटकायला जाऊ नये. एक जबादार भटक्या म्हणून आपण आपल्या सह्याद्रीचे रक्षण करावयाचे आहे. कोरोनावर अद्यापतरी कोणतीही लस आलेली नाही आणि ती लवकर येईल असेही वाटत नाही आणि ती लवकर येईल असेही वाटत नाही तरी आपण सह्याद्रीत भटकून तेथील आदिवासी लोकांना कोरोनाचा संसर्ग होईल असे करू नये.

सर्वांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, बाहेर जाताना मास्क लावा, आपले हाथ स्वछ धुवा, रस्त्यावर थुंकू नका, सर्वांत महत्वाची गोष्ट कोरोनाला घाबरू नका.