पुढील कार्यक्रम
Home / Our Treks / सरसगड – सुधागड दुर्गभ्रमण २२, २३ फेब्रुवारी २०२०

सरसगड – सुधागड दुर्गभ्रमण २२, २३ फेब्रुवारी २०२०

नमस्कार मित्रहो,

ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. २२ आणि २३ फेब्रुवारी २०२० रोजी ” किल्ले सरसगड-सुधागड “ येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ६:०० वाजता ठाण्याच्या मँगो शॉप येथून प्रस्थान आणि रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत परत ठाण्याला येणे असे दुर्गभ्रमणाचे स्वरूप राहील.


दुर्गभ्रमणाचा तपशील:

दिवस पहिला (शनिवार):
१) सकाळी ६:०० वाजता ठाणे येथून बस ने प्रस्थान.
२) सकाळी १०:०० वाजता सरसगड किल्याच्या पायथ्याला पोहोचणे. (प्रवासादरम्यान नाष्टा मध्ये होईल)
३) साधारण १०:१५ वाजता गड चढण्यास सुरुवात करणे.
४) दुपारी १२:०० वाजता गडमाथा गाठणे. 
५) १:३० वाजेपर्यंत गडफेरी आणि त्यानंतर जेवण करणे. (शनिवारचे दुपारचे जेवण सर्वांनी घरून आणायचे आहे.)
६) साधारण २:३० वाजेपर्यंत गड उतरायला घेणे.
७) संध्याकाळी ५ वाजता सुधागड गडाचा पायथा गाठणे
८) संध्याकाळी ७:३० वाजता सुधागड माथा गाठणे.
९) रात्री ९:३० पर्यंत भोजन करणे आणि ११ पर्यंत झोपणे.

दिवस दुसरा (रविवार) :
१) पहाटे ६ वाजता सर्वांनी लवकर उठणे.
२) सकाळी ८ वाजेपर्यंत फ्रेश आणि नाष्टा करून गडफेरीस निघणे.
३) साधारण ११:०० वाजेपर्यंत गडफेरी करून गड उतरण्यास घेणे.
४) दुपारी १२:३० वाजेपर्यंत गडाचा पायथा गाठणे.
५) १:०० वाजेपर्यंत पालीला पोहचून दुपारचे जेवण करणे.
६) साधारण दुपारी २:३० वाजता ठाण्याला प्रस्थान.
७) संध्याकाळी ८:०० पर्यंत ठाण्याला पोहोचणे.


दुर्गभ्रमण फी :- १८००/- रु प्रत्येकी
(यात ठाणे ते ठाणे प्रवास खर्च, ३ वेळचा नाष्टा आणि चहा, २ वेळचे जेवण – शनिवार रात्रीचे व रविवार दुपारचे आणि तज्ञांचे शुल्क)


वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.

येताना काय घेऊन याल:
१) ३ लिटर पाण्याची बाटली.
२) शनिवारी दुपारच्या जेवणाचा डबा.

३) चांगली बॅग.
४) चांगली पादत्राणे (बुट).
५) एक जोड कपडे.
६) थंडी पासून बचावासाठी स्वेटर.
७) आपले वैयक्तिक औषधे असल्यास सोबत घेणे.
८) विजेरी ( टॉर्च ) घेणे अत्यावश्यक आहे.

(कृपया सर्वांनी वेळेच्या १५ मिनिटे आधी यायचे आहे.)

सर्वांनी आपली नावे शुक्रवार दि. १९/०२/२०२० रात्री ९ वाजेपर्यंत द्यावीत.


सूचना: दुर्गभ्रमण फी संस्थेच्या खात्यात जमा केल्यावरच त्या सभासदाला ट्रेकला येता येईल ह्याची कृपया नोंद घ्यावी. नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.

खाते धारकाचे नाव : सुबोध सुरेश पाठारे
खाते क्रमांक : ४०३२००१०००००९२९
बँकेचे नाव : सारस्वत बँक, खोपट
ब्रांच कोड : ४०३
आय. एफ. एस. सी कोड : SRCB0000403


शुल्क तुम्ही गूगल पे – Google Pay 9773537532 या नंबर करू शकता.


अधिक माहितीसाठी संपर्क:
सुनिल जगताप: ९९८७७८७८३७
राकेश जाधव: ९८३३२९४४५०
चेतन राजगुरू: ९९८७३१७०८६
अभिजित काळे: ९९२०२४११८३
सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२
मनोज चव्हाण: ९००४६४११८४

नियम व अटी लागू:वरील कोणत्याही बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थेकडे राहतील.

-: दुर्गसखा :-
पर्यटनातून प्रबोधन – एक पाऊल मानवतेकडे
www.durgasakha.org