पुढील कार्यक्रम
Home / Upcoming Event / “शैक्षणिक साहित्य वाटप २०१९”

“शैक्षणिक साहित्य वाटप २०१९”

“२३ जून २०१९” दुर्गसखा आयोजित “एक मदतीचा हात” या उपक्रमातून दरवर्षी प्रमाणे यंदाही शहापूर येथील आदिवासी पाड्यातील जि. प. शाळेत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी “शैक्षणिक साहित्य” वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपली नावे दि. २० जून २०१९ पर्यंत नोंदवावीत.

*कार्यक्रमाचा आराखडा पुढीलप्रमाणे*
———————————————

१) सकाळी ठाण्याहून ६:५७ आसनगाव ट्रेन पकडून आसनगाव येथे उतरणे. “वेळेत ही ट्रेन पकडणे.”

२) जीपने जिल्हा परिषद शाळा – सावरदेव येथे शैक्षणिक साहित्य वाटप.

३) कार्यक्रम हा सकाळी “११ ते संध्याकाळ ४” पर्यंत असेल, यावेळात सकाळचा अल्पोउपाहार, भोजन आणि परिसर भ्रमंतीचा कार्यक्रम.

६) त्यानंतर सायंकाळी ५:०० पर्यंत आसनगाव स्टेशनला पोहोचून ७ पर्यंत ठाण्यात परत.

*भोजन व प्रवासखर्च धरून माणशी खर्च ३०० रूपये*

*टिप:- आपल्यासोबत १ जोड कपडे आणणे.*

अचानक उदभवणारे अकल्पित प्रसंग वेळापत्रकात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. तरी अशा प्रसंगी आपले सहकार्य अपेक्षित आहे.

तरी या कार्यक्रमास येणाऱ्या इच्छूक सदस्यांनी खाली दिलेल्या खाते क्रमांकावर कार्यक्रम शुल्क भरावे हि विनंती, जेणेकरून नाष्टा, जेवण, येण्या जाण्यासाठी लागणारे वाहन व इतर व्यवस्था करणे सोपे जाईल.

खाते धारक: सुबोध सुरेश पाठारे 
खाते क्रमांक: ४०३२००१०००००९२९
बँकेचे नाव: सारस्वत बँक , खोपट 
ब्रांच कोड: ४०३ 
आय .एफ. एस. सी कोड: SRCB0000403

अधिक माहितीसाठी संपर्क पुढीलप्रमाणे:
अजय दळवी : ९७६९५८७८०७
युवराज यादव : ९६९९७७११७०
सुनिल जगताप : ९९८७७८७८३७