पुढील कार्यक्रम
Home / Our Treks / विकटगड (पेब किल्ला)

विकटगड (पेब किल्ला)


ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे येत्या दि. १४ मार्च २०२० रोजी किल्ले विकटगड उर्फ पेबचा किल्ला येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. १४ला रात्री निघून रात्री मुक्काम आणि १५ मार्च २०२०  रोजी परत येणे असे ह्या मोहिमेचे स्वरूप राहील.
माथेरान डोंगररांगेत असलेला हा रायगड जिल्ह्यातील मध्यम श्रेणीचा किल्ला ज्याची उंची ही समुद्रसपाटीपासून २२०० फूट इतकी आहे.

 
दुर्गभ्रमंती रूपरेषा
१) १४ मार्च २०२० रोजी  ठाणे फलाट क्रमांक ३वर नेरळ परतीचे तिकीट काढून रात्री ७:४५ वाजता भेटणे.
२) ८:०४ च्या लोकलने ठाण्याहून प्रस्थान नेरळ कडे. 
३) ९:३० च्या दरम्यान नेरळ स्थानकावर.
४) नेरळ येथून टॅक्सी पकडून माथेरान वरील १३५ थांब्याला १०:३० दरम्यान पोहचुन गडाकडे मार्गस्थ.
५) रात्री ०१:०० च्या सुमारास गडावरील गुहेत मुक्काम.

१५ मार्च रविवारी सकाळ. 
१) नाश्ता करून गडफेरी करून परतीच्या मार्गावर.
२) दुपार ४ च्या सुमारास नेरळ स्थानक.
३) सायंकाळी ६ वाजता ठाणे.


दुर्गभ्रमण फी :- ५५०/-₹ प्रत्येकी (यात नेरळ ते माथेरान टॅक्सी प्रवास , २वेळ चहा नाष्टा, शैक्षणिक शालेय मदत, तज्ज्ञांचे शुल्क समाविष्ट आहे.)


येताना काय घेऊन याल.
१) शनिवार रात्रीचे जेवण सोबत घेऊन येणे.
२) ३ लिटर पाण्याची बाटली सक्तीची आहे.
३) हेड टॉर्च अथवा टॉर्च अनिवार्य आहे.
४) अंथरून, पांघरून.
५) शोल्डर बॅग असावी.
६) बुट अनिवार्य आहे.
७) एक जोड कपडे
८) चहासाठी पेला, एक ताट.
९) प्लास्टिकचा वापर टाळावा, आपण आणलेल्या प्लॅस्टिकची मोजणी होईल, परत खाली आल्यावर संख्या कमी झाल्यास त्याला २०० रु दंड आकारण्यात येईल.


अटी आणि नियम :
१) आपली नावे दिनांक १३ मार्च २०२० च्या दुपारपर्यंत द्यावित, जेनेकरुन पुढील व्यवस्था करण्यात सोइस्कर होईल.
२) दुर्गभ्रमणात मद्यपान आणि धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.    
३) दुर्गभ्रमंण फी संस्थेच्या खात्यात जमा केल्यावरच त्या सभासदाला ट्रेक ला येता येईल ह्याची कृपया नोंद घ्यावी. नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.
आपण दुर्गभ्रमंती फी ९७७३५३७५३२ या gpay नंबर वर करावी


अधिक माहितीसाठी संपर्क साधावा संपर्क
चेतन राजगुरू:  ९९८७३१७०८६
सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२


नियम व अटी लागू वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील.
टिप:- अचानक उदभवणारे अकल्पित प्रसंग वेळापत्रकात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. तरी अशा प्रसंगी आपले सहकार्य अपेक्षित आहे.  आपला

विश्वासू,दुर्गसखा.
www.durgasakha.org
https://www.facebook.com/durgasakha/
https://instagram.com/durga_sakha?igshid=48oxyyf9mbfv