पुढील कार्यक्रम
Home / Our Treks / वासोटा दुर्गभ्रमंती – २५, २६ जानेवारी २०२०

वासोटा दुर्गभ्रमंती – २५, २६ जानेवारी २०२०

नमस्कार मित्रहो,

ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे  दि. २५ व २६ जानेवारी २०२० रोजी “किल्ले वासोटा-सज्जनगड” येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. शुक्रवारी दिनांक २४ जानेवारी २०२० ला रात्री ११:५० वाजता ठाण्याहुन प्रस्थान बामणोली येथे आणि रविवारी रात्री १०:०० पर्यंत ठाण्याला परत येणे असे ह्या दुर्गभ्रमणाचे स्वरूप राहील.

वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.


दुर्गभ्रमण आराखडा :-
शुक्रवार , २४/१/२०२० रोजी रात्री ११:४५ ला ठाणे मँगो शॉपपाशी जमणे आणि मग तेथून वासोटाकडे प्रस्थान.

शनिवार सकाळी ६ च्या दरम्यान बामणोली. नाश्ता आणि सकाळचे कार्यक्रम उरकून ८ वाजता बोटीतून वासोटा गडाच्या पायथ्याशी. ९:३० वाजता वनदुर्ग भ्रमंती सुरू होईल आणि संध्याकाळी ४ पर्यंत पुन्हा गडाचा पायथा गाठून ६ वाजता पुन्हा बामणोली येथे. (दुपारचे जेवण गडावर होईल.) 
कॅम्प फायर धरण क्षेत्रातील जागेत होईल तसेच जेवण ही.

रविवारी २६ जानेवारी रोजी सकाळी ९ च्या दरम्यान नाश्ता आणि सकाळच्या विधी उरकून सज्जनगडाकडे प्रस्थान, सज्जनगड फिरून, दुपारचे जेवण करून ठाणेकडे प्रस्थान. रात्री १० पर्यंत ठाणे स्थानकावर.


दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल

१) एक शोल्डर बॅग, अंथरून पांघरून
२) चांगली पादत्राणे, बूट अत्यावश्यक
३) वैयक्तिक औषधे
४) २ ते ३ लिटर पाण्याची बाटली अत्यावश्यक (बॅग चेक केली जाईल, नसल्यास पाणी घेण्यासाठी सांगितले जाईल)
५) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )
६) वही पेन… आपणास काही लिहायचे वाटल्यास
७) सर्वांनी वेळेच्या १५ मिनिटे आधी हजर राहावे. वेळ कोणासाठीही चुकवता येणार नाही.
८) प्लास्टिकचा वापर टाळावा, आपण आणलेल्या प्लॅस्टिकची मोजणी होईल, परत खाली आल्यावर संख्या कमी झाल्यास त्याला १०० रु दंड आकारण्यात येईल.


दुर्गभ्रमण फी :- २८००/- रु प्रत्येकी ( यात ठाणे बामणोली-सज्जनगड-ठाणे  असा ६५० किमी चा प्रवास, ३ वेळचा नाश्ता, शनिवार दुपार /रात्रीचे जेवण व रविवार दुपारचे जेवण, चहा, बोटखर्च, वनक्षेत्र परवानगी, entry फी, टेंट फी, तज्ञांचे शुल्क, आणि शैक्षणिक मदतनिधी)


दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल.

सर्वांनी आपली नावे गुरुवार दिनांक २० जानेवारी  रात्री ९ वाजेपर्यंत द्यावीत.

सूचना: दुर्गभ्रमण फी संस्थेच्या खात्यात जमा केल्यावरच त्या सभासदाला ट्रेकला येता येईल ह्याची कृपया नोंद घ्यावी. नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.

खाते धारकाचे नाव : सुबोध सुरेश पाठारे
खाते क्रमांक : ४०३२००१०००००९२९
बँकेचे नाव : सारस्वत बँक, खोपट
ब्रांच कोड : ४०३

आय. एफ. एस. सी कोड : SRCB0000403

शुल्क तुम्ही गूगल पे – Google Pay 9773537532 या नंबर करू शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क:
चेतन राजगुरू: ९९८७३१७०८६
अभिजित काळे: ९९२०२४११८३
सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२
सुनिल जगताप: ९९८७७८७८३७
राकेश जाधव: ९८३३२९४४५०
मनोज चव्हाण: ९००४६४११८४

नियम व अटी लागू:वरील कोणत्याही बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थेकडे राहतील.
-: दुर्गसखा :-
पर्यटनातून प्रबोधन – एक पाऊल मानवतेकडे
www.durgasakha.org