पुढील कार्यक्रम
Home / Our Treks / किल्ले कोर्लई दुर्गभ्रमण – २४ मे २०२०

किल्ले कोर्लई दुर्गभ्रमण – २४ मे २०२०

नमस्कार मित्रहो,

ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. २४ मे २०२० रोजी ” किल्ले कोर्लई ” येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. रविवार दि. २४ मे २०२० रोजी सकाळी ६:०० वाजता ठाण्याच्या मँगो शॉप येथून प्रस्थान आणि रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत परत ठाण्याला येणे असे दुर्गभ्रमणाचे स्वरूप राहील.


दुर्गभ्रमणाचा तपशील:
१) सकाळी ६:०० वाजता ठाणे येथून बस ने प्रस्थान.
२) सकाळी १०:०० वाजता कोर्लई किल्याच्या पायथ्याला पोहोचणे.
३) नाष्टा आणि चहा प्रवासदरम्यान केला जाईल.
४) ११ वाजता गडमाथा गाठणे. 
५) १:०० वाजेपर्यंत गडफेरी आणि त्यानंतर जेवण करणे.
६) साधारण २:३० वाजेपर्यंत गड उतरायला घेणे.
७) संध्याकाळी ३ वाजता ठाणेकडे प्रस्थान. साधारण मध्येच थांबून नाष्टा करून पुढे जाणे.
८) रात्री ९ वाजता ठाण्याला पोहोचणे.


दुर्गभ्रमण फी :- ८५०/- रु प्रत्येकी

(यात ठाणे ते ठाणे प्रवास खर्च, २ वेळचा नाष्टा, २ वेळचा चहा आणि तज्ञांचे शुल्क)


येताना काय घेऊन याल:
१) ३ लिटर पाण्याची बाटली.
२) दुपारच्या जेवणाचा डबा.

३) चांगली बॅग.
४) चांगली पादत्राणे (बुट).
५) एक जोड कपडे.
६) उन्हापासून बचावासाठी टोपी.
७) आपले वैयक्तिक औषधे असल्यास सोबत घेणे.
८) प्लास्टिकचा वापर टाळावा.

(कृपया सर्वांनी वेळेच्या १५ मिनिटे आधी यायचे आहे.)

सर्वांनी आपली नावे बुधवार दि. २०/०५/२०२० रात्री ९ वाजेपर्यंत द्यावीत.


सूचना: दुर्गभ्रमण फी संस्थेच्या खात्यात जमा केल्यावरच त्या सभासदाला ट्रेकला येता येईल ह्याची कृपया नोंद घ्यावी. नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.

खाते धारकाचे नाव : श्री दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट
खाते क्रमांक : ४०३२०९१००००००७६
बँकेचे नाव : सारस्वत बँक, खोपट
ब्रांच कोड : ४०३
आय. एफ. एस. सी कोड : SRCB0000403

शुल्क तुम्ही गूगल पे – Google Pay ९७७३५३७५३२ या नंबर करू शकता.


अधिक माहितीसाठी संपर्क:
सुनिल जगताप: ९९८७७८७८३७
राकेश जाधव: ९८३३२९४४५०
चेतन राजगुरू: ९९८७३१७०८६
अभिजित काळे: ९९२०२४११८३
सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२
मनोज चव्हाण: ९००४६४११८४

नियम व अटी लागू:वरील कोणत्याही बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थेकडे राहतील.


संस्थेने आयोजित केलेल्या वरील दुर्गभ्रमणाचा संपूर्ण नफा हा शहापूर तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जाईल.

-: दुर्गसखा :-
पर्यटनातून प्रबोधन – एक पाऊल मानवतेकडे

www.durgasakha.org